Breaking News

भिवंडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; 39 जण अटकेत


ठाणे, दि. 13, मे - भिवंडीत एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 39 जणांना अटक केल्याची घटना घडली आहे. भिवंडीत अनेक ठिकाणी मटका जुगाराचे अड्डे सुरू झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. जुगारामध्ये पैसे हरल्याने कुटुंबावर उपाशीपोटी राहण्याचे प्रसंग ओढवत आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली. या कारवाईत जुगार मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकून तब्बल 39 जुगारींना अटक केली.