Breaking News

थोरात कारखाना करणार चारी दुरुस्ती

संगमनेर : भोजापूर धरणांतर्गत असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोण व तळेगाव दिघे भागातील भोजापूर पूरचारीच्या दुरावस्थेची नुकतीच थोरात साखर कारखान्याच्या पदाधिकार्‍यांनी पाहणी केली. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात साखर कारखान्यामार्फत या पूरचारीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, पिंपळेचे सरपंच भाऊ कोटकर, चिंचोली गुरवचे उपसरपंच संपतराव सोनवणे, प्रकाश सोनवणे, गोरख सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, नानासाहेब कोटकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.