Breaking News

मानवता हाच सर्वश्रेष्ठ खरा धर्म ः शरद पवळे रोजानिमित्त नारायणगव्हाणमध्ये फराळ वाटप

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे रोजानिमित्त मुस्लीम बांधवांना फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी पवळे म्हणाले की, आज प्रत्येक धर्म हा मनुष्याला स्वत:ची ओळख निर्माण करुन देतो, जन्माला आल्यानंतर जीवन कसे गायचे याचे संस्कार धर्मातुन मिळते. धर्म मनुष्याला शुद्ध आचरण प्राप्त करुन देवुन जगावर प्रेम करण्याची कला प्राप्त करुन देतो, परंतु कोणत्याही धर्माचे अर्धवट ज्ञान घेवुन स्वार्थासाठी धर्माचा वापर करणे हा आज गंभीर विषय बनला आहे. जी व्यक्ती स्वत:मध्ये असणार्‍या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, द्वेष अहंकारावर नियंत्रण करुन दुसर्‍याच्या जीवनात आनंद प्राप्त व्हावा म्हणून अखंड निस्वार्थ समाजाची सेवा करुन समाजावर अत्यंत प्रेम करते, तीच व्यक्ती खर्‍या अर्थाने धर्माचे पालन करते. समाजामध्ये माझंं तुझं, आपलं परकं ही भावना नष्ट होवुन एकोपा, आपलेपणा निर्माण व्हावा म्हणुन आम्ही समाजोपयोगी प्रेरणादायी उपक्रम राबवण्याचा संकल्प याठिकाणी घेत असल्याचे पवळे म्हणाले.

रमजान महिन्याच्या पवित्र रोजानिमित्त नारायणगव्हाण येथिल मुस्लिम बांधवांना शरद पवळे व सचिन शेळके यांनी फराळ वाटप करुन समाज बांधवांना शुभेच्छा देत बंधुभाव व एकात्मतेचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी मौलाना मुज्जफर अन्सारी व गावातील मुस्लिम बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके यांचे आभार मानले. सबका मंगल सबका भला अशी भावना व्यक्त करत समाजामध्ये प्रेमाचा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला. दरवर्षी राबवत असलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे. यावेळी मुस्लीम बांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.