‘सीना’च्या आवर्तनामुळे हसू आणि आसू
मिरजगाव : सीना धरणातून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतक-यांच्या चेह-यावर समाधान दिसत आहे. मात्र या आवर्तनास काहीसा विलंब झाल्याने भुईमुगासह उन्हाळी पिकांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या आवर्तनामुळे हसू आणि आसू असे संमिश्र भाव व्यक्त होत आहेत.
सीना धरणातुन तीन आवर्तने होतील, या विश्वासावर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतली आहेत. शिवाय जनावरांसाठी चारा पिकेदेखील घेतली आहेत. परिसरातील विहीरी आणि कूपनलिका आटु लागल्या आहेत. त्यामळे शेतकरीवर्ग चिंतेत पडले होता. संबधित विभागाने सीना धरणातून पाणी सोडण्यास कमालीचा विलंब लावला. त्यामुळे उन्हाळी पिके जळण्याच्या बेतात होती. मात्र सीना धरणातून दि. ४ मे पासून आवर्तन सोडण्यात आले आहे. याबाबत मांडओहोळ कालवा मिरजगाव उपविभागाचे अधिकारी तुकाराम मचे म्हणाले, सीना लाभक्षेत्रातील पिकांना पाणी देण्यासाठी दुसरे आवर्तन सोडले आहे. राज्य जलसंपदा नियमन प्रधिकरणाने दि. १ मार्चपासून पाणीपट्टी घनमापन पध्दतीनुसार सुधारात दर लागू लागू केले आहेत. त्यामुळे पाणीपट्टी आणि पाणीमागणी अर्ज भरणे गरजेचे झाले आहे.