...मनुष्यास वैकुंठ दूर नाही : भागवताचार्य शंकर महाराज
नेवासाफाटा : मनुष्याचे मन हे जगातील सर्वात वेगवान गोष्ट आहे. अज्ञानी माणसाच्या संगतीने मनुष्य जीवनाचा नाश होत असतो म्हणून सज्जनांची संत संगती जीवनात करा. संत संगतीनेच मनुष्य जीवनाचा खरा उद्धार होतो. संत आणि गुरु हे मनुष्य जीवनात मिळाले तर वैकुंठ दूर नाही, असे प्रतिपादन भागवताचार्य ह. भ. प. शंकर महाराज यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त शनिवारी {दि.१९} श्रीमद भागवत कथा व श्रीदत्त लक्ष्मी-नारायण यागास गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते भागवत ग्रंथ पूजनाने उत्साहात प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्यापेक्षा ही माझा शिष्य मोठा झाला पाहिजे, असा गुरुभाव गुरूंचा आपल्या शिष्यांबद्दल असतो. जीवनात संसारात परमार्थ आणला तर मनुष्याचा संसारही मंगलमय होतो. आपलेच कर्म जीवनात आपल्याला अधोगतीला नेतात.
भागवत कथेप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मातोश्री प. पू. सरुबाई पाटील, हभप लक्ष्मीनारायण जोंधळे, हभप मारुती महाराज काळे, श्रीधर जाधव, मारुती साबळे, ज्ञानदेव लोखंडे, निवृत्ती सुडके पाटील, अंबादास फोलाने, भाऊसाहेब कोकणे, किरण धुमाळ, कडू पाटील, संत सेवेकरी बदाम महाराज पठाडे आदींसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.