Breaking News

नेवाशात देशी बनावटीचे पिस्तुल जप्त; एकास अटक

नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - नेवासा शहरातील खळवाडी भागात राहत असलेल्या एका तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. नेवासे शहरात बसस्थानक शेजारी खळवाडी येथे राहत असलेल्या सचिन उर्फ गटण्या राजेंद्र पवार (21) याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सचिन उर्फ गटण्या याच्या घरात जाऊन त्यास पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या उषाखाली देशी बनावटीचे किंमत चाळीस हजार रुपये असे पिस्तुल सापडले. पिस्तुल जप्त करण्यात आले असून सचिन पवार याने विनापरवाना बेकायदा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी सचिन पवार याच्या विरुद्ध आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पवार याच्यावर याआधी 395, 420 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये तो फरारी होता. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा उपविभागीय अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, पो. कॉ. बाबासाहेब लबडे, विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गिते, हनुमंत गर्जे, संदीप दरंदले यांनी ही कारवाई केली.