सामुहिक विवाह सोहळ्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
बीड जिल्हा धर्मदाय संस्थेंतर्गत सामुहिक विवाह सोहळा दि. 12 मे रोजी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यास धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे, धर्मदाय सहआयुक्त शशिकांत हेरलेकर, धर्मदाय उपायुक्त बीड के.आर. सुपाते-जाधव, सहाय्यक धर्मदाय आयुक्त बीड संजय पाईकराव, सहाय्यक धर्मदाय आयुक्त बीड, काशिनाथ कामगौडा, धर्मादाय सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळा समितीचे सचिव विजय बंब यांचेसह बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठीत लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन जैन कॉन्फरन्स कार्यकारणीचे राष्ट्रीय सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कोठारी यांनी म्हटले आहे की, शनिवार दि. 12 मे रोजी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियम येथे हा सर्व धर्मिय सामुहिक विवाह सोहळा सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला असुन सामुदायिक विवाह योजनेत आयोजकांकडून वधूवरांसाठी संसारोपयोगी वस्तु, वधु-वरांसाठी पोषाख, मनीमंगळसुत्र, जोडवे आदी साहित्य देण्यात येणार आहे. या सर्व धर्मिय विवाह सोहळ्यास बीड जिल्ह्यासह जामखेड तालुक्यातील गरजूवंतांसह सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जैन कॉन्फरन्स कार्यकारणीचे राष्ट्रीय सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले आहे.