Breaking News

संगणकीय युगात युवकांनी शिवनीती आचरणात आणुन चौफेर प्रगती करावी : राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले

सातारा,  (प्रतिनिधी) : सुमारे 400 वर्षापूर्वी युध्द कला आणि युध्दनीती कशी होती, तसेच शिवकालीन शस्त्रे व खेळ कोणते होते हे आज बहुतांशी व्यक्ती आणि युवकांना माहीती नाही. त्यामुळे राजधानी महोत्सवातील शिवजागर या कार्यक्रमामधुन शिंवकालीन शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन व खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा घेतलेला उपक्रम निश्‍चितच ऐतिहासिक काळात घेवून जाणारा आहे. किल्ले अजिंक्यतारा-सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती, आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमामधुन आणि जाज्वल्य इतिहासामधुन बोध घेवून, आधुनिक संगणकीय युगामध्ये युवकांनी शिवनीती आचरणात आणुन चौफेर प्रगती करावी, असे आवाहन सातारच्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी केले.

राजधानी सातारा महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या शिवजागर कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले बोलत होत्या. यावेळी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराव भिडे गुरुजी, सातारा पालिकेच्या नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, सातारा पालिकेच्या माजी नगराध्यक्ष व नगरसेविका स्मिता घोडके, माजी नगराध्यक्ष सौ. रंजना रावत, सौ. सुजाता राजेमहाडीक,यांच्यासह मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

राजधानी महोत्सव हा सातारा जिल्हावासियांचा महोत्सव आहे, या महोत्सवाच्या उपक्रमातुन युवकांसह सर्वाना जीवनाची प्रेरणा मिळावी म्हणून शिवजागरसह युवागिरी आणि सातारा गौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा प्रत्येक सातारकर नागरीकांनी आणि महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही याप्रसंगी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी केले.

यावेळी पुष्पगुच्छ देऊन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले फौन्उेशन ऑफ कल्चरल अ‍ॅक्टीव्हीटी आणि पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने पंकज चव्हाण व मान्यवरांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिवकालीन पोवाडे, मर्दानी खेळ, तसेच शिवकालीन शस्त्रांस्त्रांची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. सुमार 2 ते अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमास उपस्थितांनी दाद दिली. सातारचा बालकलाकार कुमार विरेन पवार याने आपल्या खणखणीत आवाजात पोवाडा सादर करुन, उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, सुनिल सावंत, संदिप शिंदे, बाळासाहेब गोसावी, बांधकाम सभापती मनोज शेेडे, नगरसेवक दत्तात्रय बनकर, संजय शिंदे, संजय पाटील,किशोर शिंदे, राजु भोसले, बबलु साळुंखे, संग्राम बर्गे, काका धुमाळ, गणेश जाधव, आर.वाय.जाधव सर, अ‍ॅड.अंकुश जाधव, अ‍ॅड.विकास पवार, बाळासाहेब चोरगे, प्रताप शिंदे, सुनील बर्गे, शुभम ढोरे, हर्षल माने, सौरभ सुपेकर,राजु गोडसे,रविंद्र झुटींग,सौ.गितांजली कदम, यांचेसह सातारा परिसरातील बहुसंख्य नगरिक तसेच शिंवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान शनिवार, दि.26 मे रोजी युवागिरी हा गितसंगीताचा खास युवकांसाठी कार्यक्रम आयोजित केला असून, रविवार, दि. 27 मे रोजी प्रतिष्ठेच्या शिवसन्मान पुरस्कारासह, सातारा गौरव पुरस्काराचे वितरण व पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीचा स्टेप-अप हा कार्यक्रम होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम शाहू स्टेडीयमवर सायंकाळी 6.00 वांजता होणार आहेत, या कार्यक्रमांना सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.