Breaking News

रस्ता अपघातात एक ठार ; दोन जखमी


श्रीरामपूर / ता. प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील वणी येथील लग्नसमारंभ आटोपून बेलापूरला घरी परतत असताना विंचुरजवळ झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत. 

बेलापूर येथील लग्नसमारंभ वणी येथे होता. हा विवाह समारंभ आटोपून पवन अग्रवाल, धीरज अग्रवाल, रोहित साळुंके हे तिघेजण मोटार सायकलवरुन घरी परतत होते. विंचुर फाट्यानजीक चार चाकी वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. यात पवन अग्रवाल हा जागेवरच मयत झाला. तर रोहित साळुंके व धीरज अग्रवाल हे गंभीर जखमी झाले. मयत पवन अग्रवाल याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. जनसेवा पंतसस्थेचे लिपिक गणेश अग्रवाल यांचा तो धाकटा बंधू होता.