Breaking News

‘जय जनार्दन’च्या अध्यक्षपदी जाधव

कोेपरगांव : तालुक्यातील कासली येथील जय जनार्दन सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे रावसाहेब त्र्यंबक जाधव तर उपाध्यक्षपदी विलास बापू भगुरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. जाधव यांच्या नावाची सूचना बाबासाहेब मलिक यांनी केली.त्यास साहेबराव मलिक यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी विलास भगुरे यांच्या नावाची सूचना अर्जुन मलिक यांनी केली.त्यास विश्राम आहेर यांनी अनुमोदन दिले. नूतन पदाधिकाऱ्यांचे आ स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, विवेक कोल्हे, शरद थोरात, कैलास खैरे, बाळासाहेब पानगव्हाणे, त्र्यंबकराव सरोदे, नवनाथ आगवण, भास्कर भिंगारे आदींनी अभिनंदन केले.