भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्करांचा चतूर्थ श्रेणी खटाटोप
पुणे/ विशेष प्रतिनिधी : पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांचीही वाटचाल मुंबई शहर इलाखा साबांतील मंत्रालय पोखरणार्या कार्यक ारी अभियंत्यांप्रमाणे सुरू असल्याने नजिकच्या भविष्यात शहर इलाखा नंतर पुणे साबांही भ्रष्ट म्हणून ओळखला जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भरतकुमार बाविस्कर निर्ढावलेले कार्यकारी अभियंता म्हणून साबांत ओळखले जात असून ‘चीत भी मेरी पट भी मेरा’ ही त्यांची प्रवृत्ती असल्याची चर्चा आहे. या प्रवृत्तीतूनच पुणे साबांत सुरू असलेली त्यांची मनमानी उघड होऊ नये म्हणून काही स्थानिक पत्रकारांना हाताशी धरून पुणे इन्स्पेक्शन बंगलो म्हणजे आयबीच्या शासकीय कर्मचार्यांना बदनाम क रण्याचे पाप केले आहे.
साबांत भ्रष्टाचाराला वाव देऊन आपल्या जाळ्यात न येणार्या सहकारी अभियंत्यांना आणि कनिष्ठ कर्मचार्यांच्या बदनामीचे स्तोम माजविण्याचा प्रमाद भरतकुमार बाविस्कर करीत आहेत. जाणते अजाणतेपणे साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्याच्या षडयंत्राचा हा एक भाग असल्याची साबांत सुरू असल्याची चर्चा बोलकी आहे. या संदर्भात अधिक तपशिल उद्याच्या अंकात(क्रमशः)