मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून प्रधान सचिवांच्या दालनातील सोनेरी पेपरची चौकशी निष्पक्ष चौकशी करण्यासाठी आ. वाघमारे यांचा चामलवार यांच्याकडे आग्रह
मुंबई/ विशेष प्रतिनिधी :प्रधान सचिवांच्या दालनात लावलेला नऊ लाखांचा सोनेरी पेपर अखेर अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्या चौकशीच्या कक्षेत आला. रणजीत हांडे यांच्यासह अन्य संश यितांना सोबत घेऊन दक्षता पथकाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी चौकशीचा श्रीगणेशा केला.
आ.चरणभाऊ वाघमारे यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी शहर इलाखा साबां विभागातील घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले. यात प्रामुख्याने सहाव्या मजल्यावरील दालन क्रमांक 618 या साबांचे प्रधान सचिव यांच्या कार्यालयाला तब्बल नऊ लाख रूपयांचा सोनेरी पेपर लावल्याची बाब समाविष्ट आहे. या सोनेरी पेपरच्या मुद्याने प्रधान सचिव आशिषकुमार सिंह हे देखील बुचकळ्यात पडल्याने या कर्तृत्वाचे गांभिर्य किती भयानक आहे. याची कल्पना येते. या दालनाची चौकशी करण्यासाठी मुंबई साबां दक्षता पथकाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार स्वतः गेल्याने शासनाने ही बाब गंभीरतेने घेतल्याचे जाणवते. चामलवार यांनी ही पाहणी करताना या सोनेरी पेपर कांडात संश यित असलेले तत्कालीन कार्यकारी अभितंता रणजीत हांडे, प्रज्ञा वाळके, उपअभियंता बासुंदे या मंडळींना सोबत नेले हे विशेष. आशिष कुमार सिंह यांचे दालन तपासण्यापुर्वी शहर इलाखा साबां विभागाचे कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीचा सोपस्कार पार पाडल्यानंतर प्रधान सचिवांच्या दालनाची पाहणी पुर्ण झाली. यावेळी तक्रारदार आ. चरणभाऊ वाघमारे यांचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्याशी संभाषण केले. या संभाषणादरम्यान निष्पक्ष चौकशी करून हे सरकार खर्या अर्थाने पारदर्शक आहे हा सिध्दांत मांडा अशी विनंती धनंजय चामलवार यांनी केली. दरम्यान धनंजय चामलवार यांनी ही चौकशी मनावर घेतल्याने हांडेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी चामलवार यांचेशी खल करण्याचा खटाटोप केल्याचे समजते. हांडे यांनी नेमका काय खल केला असेल याविषयी सविस्तर वृत्त