Breaking News

'स्मार्ट सिटी' अभियानात ५० हजार काेटींच्या तेराशे याेजना पूर्णत्वास


नवी दिल्ली :  केंद्र सरकारने गुरुवारी 'स्मार्ट सिटी' अभियानात ५० हजार ६२६ काेटी रुपयांच्या १,३३३ याेजना पूर्ण झाल्याची किंवा शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती दिली. याबाबत माहिती देताना केंद्रीय अावास व शहरी कार्य मंत्रालयाने सांगितले की, देशभरात सर्व ९९ स्मार्ट शहरांसाठी २,०३,९७९ काेटी रुपयांच्या याेजनांची कामे सुरू अाहेत. 

तसेच अातापर्यंत निवडण्यात अालेल्या ९९ स्मार्ट शहरांपैकी ९१ शहरांत एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेइकल्स) बनल्या अाहेत. यासह अहमदाबाद, राजकाेट, बडाेदा, विशाखापट‌्टणम, भाेपाळ, पुणे, काकीनाडा, सुरत व नागपूर या शहरांत एकीकृत सिटी नियंत्रण कक्ष (अायसीसीसी) स्थापन केले अाहेत.