Breaking News

बालिकेची बलात्कार करून हत्या; युवकाला फाशी


मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील मनावर तालुक्यात चारवर्षीय बालिकेची बलात्कार करून हत्या करणाऱ्या अाराेपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठाेठावली. करण ऊर्फ फतिया असे या प्रकरणातील अाराेपीचे नाव अाहे.

दरम्यान, मध्य प्रदेशात अशा प्रकरणातील अाराेपीला फाशीची शिक्षा सुनावण्याचा हा दुसरा निर्णय अाहे. यापूर्वी २०१२मध्ये सहावर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मनावर येथीलच न्यायालयाने अाराेपीला फाशीची शिक्षा सुनावली हाेती.