Breaking News

बोधगया बॉम्बस्फोटातील पाचही दहशतवादी दोषी

पाटणा - जुलै 2013 मध्ये महाबोधी मंदिर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. पाटणा येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात 90 लोकांनी साक्ष दिली होती. एनआयए न्यायालयाचा हा एक फार महत्त्वाचा निर्णय आहे. एनआयए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मनोज कुमार सिन्हा यांनी आज हा निकाल दिला. 11 मे रोजी याची सुनावणी पूर्ण झाली होती. आज सर्व आरोपींना कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात आणण्यात आले. या प्रकरणात 90 लोकांनी साक्ष नोंदवली. उमर सिद्दीकी, अझरुद्दीन कुरेशी, हैदर अली, मुजीबल्ला अंसारी आणि इम्तियाज अन्सारी अशी आरोपींची नावे आहेत. पाटणाच्या गांधी मैदान सीरियल बॉम्बस्फोटातही हे सर्वजण आरोपी आहेत. बोधगया स्फोटात सहा आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सहावा आरोपी अल्पवयीन होता.