Breaking News

कुमारस्वामींनी जिंकला विश्‍वासदर्शक ठराव भाजप आमदारांचा सभात्याग ; विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड

बंगळुरू/ कर्नाटक विधानसभत्त निवडणूकांचे निाकल हाती आल्यानंतर रंगलेले राजकीय नाटय आता संपुष्ठात आल्यात जमा आहे. कारण शुक्रवारी कुमारस्वामी यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकत कर्नाटकच्या विधानसभेमध्ये आजच बहुमत सिद्ध केले.त्यामुळे यापुढे आता कर्नाटक राज्यावर जेडीएस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची सत्ता असणार आहे. 

विश्‍वासदर्शक ठरावावेळी 117 आमदारांनी कुमारस्वामी सरकारच्या बाजूने मतदान केलं असून रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बहुमत चाचणीचं मतदान हे आवाजी मतदानाने पार पडलं. दरम्यान या मतदानावर भाजपने मात्र बहिष्कार टाकत भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला तर दुसरीकडे हे बहुमत सिद्ध होत असतानाच येडियुरप्पा यांनी येत्या 28 तारखेला कर्नाटक बंदची हाक दिली. कुमारस्वामी सरकारने शेतकर्‍यांना त्वरित कर्ज माफी द्यावी अशी मागणी करत त्यांनी हा बंद पुकारला. त्यामुळे यापुढे कुमारस्वामी सरकार स्थानापन्न झालं असल तरी सरकार आणि विरोधक म्हणजेच भाजप यांच्यातला संघर्ष यापुढे कर्नाटक राज्यात पाहायला मिळणार आहे.
बहुमत ठरावाच्या आधी कुमारस्वामी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बी एस येडियुरप्पा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुढील पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार आहे, असा विश्‍वास व्यक्त करताना काँग्रेसलाही एक प्रकारे इशारा दिला. दरम्यान, राज्यातील शेतकर्‍यांनी संपूर्ण कर्ज माफी देण्यावर भर राहिलं. राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी कशी द्यायचे हे मला तुम्ही मला सांगण्याची गरज नाही, असे सांगत भाजपला सुनावले.


भाजपची माघार 
विश्‍वासदर्शक ठरावाच्याआधी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. आर. रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपचे वरिष्ठ नेते सुरेशकुमार यांनी अध्यक्ष निवडणुकीतून माघार घेतली. कर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपनं खेळलेला डाव काहीही उपयोगी ठरला नाही. बहुमत चाचणीआधी होणार्‍या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात भाजपने एस. सुरेश कुमार यांना उतरवले. मात्र, निवडून येण्यासाठी लागणार्‍या संख्याबळाची जुळवाजुळव होत नसल्याचे पाहून एस. सुरेश कुमार यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आणि भाजपचा अखेरचा दुसरा डावही समाप्त झाला.