नगरसेवक दिलीप दातीर हल्याप्रकरणी प्रणव बोरसेला 7 वर्षे सक्तमजुरी
नाशिक, दि. 06, मे - दिलीप दातीर हल्याप्रकरणी प्रण याला 7 वर्षे सक्त मजुरी व 10 हजाराच्या दंडाची शिक्षा आज न्यायालयाने ठोठावली आहे. 15 एप्रिल 2016 रोजी तत्कालिन मनपा सभाग ृह नेते नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर अंबड पोलीस ठाणे हद्दीतील कामठवाडे परिसरातील मयूर हॉस्पिटल जवळ प्रणव तुकाराम बोरसे व बाळा कापडणीस या सराईत गुन्हेगारांनी प्राणघातक हल्ला केला होता.
या प्रकरणी दातीर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात केस नं- 300/2016- अंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं- 92/16 नुसार गुन्हा दाखल झाला होता.त्या खटल्याचा आज शनिवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागला असून जिल्हा व सत्र न्यायाधीश नं- 3 यांनी आरोपी प्रणव बोरसे विरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, खंडणी मागणे व प्राणघातक शस्त्र बाळगणे आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून भा.द.वि. कलम 307,385,386,427,504,506,507 तसेच भारतीय हत्यार कायदा- 3/25 अन्वये 7 वर्षे सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याप्रकरणातील दुसरा आरोपी बाळा कापडणीस अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. कल्पक निंबाळकर यांनी तर दिलीप दाच्या बाजूने अॅड. श्यामला दीक्षित यांनी काम पाहिले. तर तपासी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक एस.एस.वाघ यांनी काम पाहिले. न्यायालयीन प्रक्रियेत न्यायालयाने एकुण 10 साक्षीदार तपासले तर महत्त्वाचा पुरावा जखमी म्हणून स्वतः दिलीप दातीर यांची साक्ष ग्राह्य धरली.