नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून 10 लाख उकळले, गुन्हा दाखल
नागपूर, दि. 06, मे - नागपुरातील इमामवाडा पोलिसांनी नोकरीचे आमिष दाखवून 10 लाख रुपये उकळणा-या तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बशिर रमजान खान, रेणू ऊर्फ जोया जमिर खान आणि जमीर बशिर खान अशी याआरोपींची नावे आहेत. हे तिघेही मोठा ताजबाग परिसरात राहतात.
याप्रकरणी शहरातल्या उंटखाना परिसरातील ईगल पॅलेसमध्ये राहणारे रमाकांत भगवानदास ताम्रकर यांनी दिलेल्या पोलिस तक्रारीनुसार त्यांची रेल्वेचे निवृत्त कर्मचारी बशिर खान यांच्यासोबत ओळख होती. त्यातून ते खान परिवारातील सदस्यांच्या संपर्कात आले. ताम्रकर यांना आयुष आणि अमन नामक मुले आहेत. ते बेरोजगार असल्यामुळे या दोघांना चांगली नोकरी मिळावी म्हणून ताम्रकर प्रयत्नरत होते. त्यांनी खान यांच्याकडेही आयुष आणि अमनच्या नोकरीचा विषय काढला होता. या दोघांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष बशिर खान, जमीर आणि जोया खान या तिघांनी दाखविले. त्यानंतर 1 सप्टेंबर 2016 ते 6 फेब्रुवारी 2017 या कालावधीत ताम्रकर यांनी आरोपींना 10 लाख रुपये दिले. पोलिसांच्या माहितीनुसार, ही रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी आयुष आणि अमनला नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र दिले. प्रत्यक्षात नोकरी मिळालीच नाही. त्यामुळे ताम्रकर यांनी आपली रक्कम परत मागितली. ती परत न मिळाल्याने प्रकरण इमामवाडा ठाण्यात गेले. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर उपरोक्त तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील बशिर खानला अटक करण्यात आली असून, जमीर व जोयाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.