Breaking News

अफगाणिस्तानमध्ये 6 भारतीय अभियंत्यांचे अपहरण


काबूल : अफगाणिस्तानमध्ये काही अज्ञात शस्त्रधारकांनी बांधकाम क्षेत्रातील एका भारतीय संस्थेतील 7 कर्मचार्‍यांचे अपहरण केले आहे. यामध्ये एका अफगाणी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. अफगाणिस्तानमधील बागलान प्रातांत आज सकाळी ही घटना घडली. अपहरण झालेले सर्व कर्मचारी अभियंते असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या अज्ञात बंदूकधार्‍यांनी बागलान प्रांताची राजधानी पुल-ए-खोमरेच्या बाग-ए-शामल या गावातून कर्मचार्‍याचे अपहरण केले आहे. स्थानिक अधिकार्‍यांच्या मते, हे सर्व अभियंते एका मिनी बसने जिथे एका भारतीय कंपनीला विद्यूत सब-स्टेशनचे कॉन्ट्रक्ट मिळाले आहे त्या ठिकाणी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आहे. बागलान प्रांत प्रशासनाने या घटने मागे तालिबानी दहशतवादी संगठनेचा हात असल्याचे सांगितले आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघटनेकडून अशा प्रकारचे माहिती समोर आली नाही. अथवा जबाबदारी स्वीकारली नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या अभियंत्याचे अपहरण झालेल्या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच परराष्ट्र खाते अफगाणिस्तानतच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे.