Breaking News

मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच 10 दिवसांत 9 खून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

नागपूर : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असून, दिवसाढवळया खून करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यातच नागपूर जिल्हा म्हटला की, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून समोर येतो. मात्र याच नागपूरमध्ये यापूर्वी देखील अनेक व्यापार्‍यांचे दिवसाढवळया खून करण्यात आले आहेत. तरी देखील खूनांचे सत्र काही संपेना. नागपूरमध्ये रविवारी पुन्हा एकाचा खून झाल्याचे समोर आले आहे. अनिकेत भेंडारकर याची हत्या झाली. दुबे नगरमध्ये झालेल्या या खूनाच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. गेल्या 10 दिवसांत नागपूरमध्ये 9 जणांची हत्या झाली. जिल्ह्यात होणार्‍या या सततच्या हत्येच्या सत्रामुळे नागपूरमधील कायदा आणि सुव्यस्थेवर सर्वसामान्य लोकांकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागपूरमध्ये 9 दिवसात तब्बल 6 जणांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या आहेत. नागपूर हुडकेश्‍वर परिसरात आणखी एकाचा खून झाला. दुबे नगरात खूनाच्या घटनेने लोकांमध्ये रोष आहे. शहरात 3 तारखेला भरदिवसा रामनगर परिसरात शौचालय कर्मचार्‍याची हत्या करण्यात आली होती. त्याच रात्री एमआयडीसी पोलीस स्थानक हद्दीत श्रीकांत गुहे या तरुणाची हत्या झाली, त्याच्या 6 दिवस आधी हत्येच्या 2 घटना शहरात घडल्या होत्या. अशा 9 दिवसांत नागपूर जिल्ह्यात तब्बल 6 हत्येच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील या हत्येच्या सत्रामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरच सर्वसामान्य लोकांकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागपूरमध्ये याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत . त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला पायबंद कसा घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.