Breaking News

5 लाखांचा मुद्देमाल जप्त


भंडारा, दि. 26, मे - भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात पोट निवडणुकीनिमित्त अवैध मद्याची तस्करी विरोधात कार्यवाही करण्यात आली असून या मोहिमेत 5 लाख 5 हजार 360 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पवनी तालुक्यातील परिसरात अवैद्य गुन्हा अन्वेषणकामी फिरतीवर असताना गुप्त माहितीच्या आधारे मौजा वाही शिवारात वाहतूक करीत असताना एक हिरव्या रंगाची टोयाटो कॉलिस क्र. एम.एच. 16 ई. 4319 वाहन थांबविण्यात आली. पाहणी केली असता एकूण 66 खरड्याच्या पेट्यात 90 व 180 मिली क्षमतेच्या टॅगोपंच ब्रँडच्या देशीदारुच्या एकूण 3480 सिलबंद बाटल्या व वाहनासह असा एकूण 5 लाख 5 हजार 360 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदाचे विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.