सुपा येथिल भजनी मंडळ साहित्यासाठी 54 हजारांचा निधी
सुपा / प्रतिनिधी । पारनेर तालुक्यातील सुपा येथिल पांडूरंग सेवा मंडळ व संकल्प भजनी मंडळाच्या साहित्य खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत 54 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार यांच्या हस्ते काल सकाळी 11 वाजता दोन्ही भजनी मंडळाच्या सदस्यांकडे ही रक्कम धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली.
सुपा येथे वर्षातुन तीन वेळा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. एकादशी, चतुर्थीसह प्रतिदिनी भजनी मंडळाच्यावतीने काकडा आरती घेण्यात येते. यासाठी साहित्यांची कमतरता भासत असल्याने भजणी मंडळाने उपसभापती पवार यांचेकडे साहित्य उपलब्ध व्हावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार पवार यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिल्याने, भजनी मंडळाच्या वतीने उपसभापती दीपक पवार यांचे आभार मानले.
यावेळी पारनेर पं.स.चे उपसभापती दीपक पवार, उपसरपंच राजु शेख, दिलीप पवार, भास्कर पवार, संदिप पवार, दत्तात्रय पवार, गोंविद शितोळे, दिलीप पिपाडा, विठ्ठल पवार, राजु शहाणे, दिगंबर पवार, बबन ठोकळ, अमोल पवार, प्रविण सुपेकर, नितीन पवार, सुरेश नेटके, दादा गवळी, शुभम शिंदे, तुकाराम पवार, कुमार पवार, काळे महाराज, लहानू पवार, सचिन काळे, संभाजी पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.