Breaking News

विष घेवून तरूणाची आत्महत्या

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील एका युवकाने घराजवळील शेतात सायंकाळी 4 वाजता विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील दिगांबर रामा भदे (वय 22) युवकाने आपल्या घराजवळील डाळींबाच्या बागेत सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास विष प्राशन केले. तब्बल दीड तासाने हा प्रकार त्याच्या आईने पहिला, त्यानंतर त्यास तातडीने श्रीगोंदा शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी येथील खाजगी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसल्यामुळे याबाबत मोठ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत, मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.