Breaking News

काश्मीरात 5 दहशतवाद्यांचा खात्मा हिजबुलच्या कमांडरसह 5 दहशतवादी ठार

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियानमधील बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरसह 5 दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामध्ये 2 जवान जखमी झाले. या चकमकीत हिजबुलचा मुजाहिदीनचा कमांडर सद्दाम पाडर याच्यासह पाच जणांना जवानांनी कंठस्नान घातल्याने दहशतवादी बुरहान वानीची गँग संपुष्टात आली असल्याचं बोललं जात आहे. चकमकीत सद्दाम पाडरसह डॉक्टर मुहम्मद रफी भट्ट, बिलाल मौलवी आणि आदिल मलिकचा समावेश आहे. रफी भट्ट हा काश्मीर विद्यापीठाचा प्राध्यापक आहे. पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. परिसरात शोधमोहिम अजूनही सुरू असल्याची माहिती आहे.

या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सद्दाम पोद्दार हा देखील ठार झाला झाल्याचे सांगण्यात येत आहे.प्रशासनाने परिसरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत केली आहे. शोपियानचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेंद्र शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की आम्ही दहशतवाद्यांना आत्मसमर्पन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यांच्याकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. या स्थितीत त्यांची संख्या किती आहे हे सांगणे शक्य नाही.
कालच चट्टबल परिसरात सेना आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर रविवारी दुसर्‍या दिवशीदेखील चकमक होत आहे. कालच्या चकमकीदरम्यान एका नागरिकाचादेखील मृत्यू झाला, तर सीआरपीएफच्या 2 जवानांसह 1 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या कारवाईत दहशतवाद्यांकडून 3 एके रायफलसह दारुगोळादेखील जप्त करण्यात आला होता. तसेच पुलवामात वाहमूमध्येदेखील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष अधिकारी शौकत अहमद दार यांच्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्या घराजवळच हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही काळापासून सेना आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने अशाप्रकारच्या चकमकी होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सेनादेखील सतर्क असून दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले जात आहे. सीमेपलिकडून देशात घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.