काश्मीर विद्यापीठाचा बेपत्ता प्राध्यापक ठार
मागील आठवड्यापासून बेपत्ता असलेला काश्मीर विद्यापीठाचा प्राध्यापक देखील दहशवाद्यांसोबत ठार झाला आहे. संबंधित प्राध्यापकाचे नाव मुहम्मद रफी भट असे असून, तो काश्मीर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होता. शनिवारी प्राध्यापक भट याच्या शोधाची मागणी करत विद्यार्थ्यांनी काश्मीर विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन देखील केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भट याच्या आईसह पत्नी आणि भावाला बडगाम येथे आणले होते. तसेच भट याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यास सांगितले होते. मात्र, या आवाहनाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.