फडणवीस सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी सिद्ध करावी
सांगली - भाजप म्हणजे ‘भारत जलाव पार्टी’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी देण्यात आलेली 34 हजार कोटींची कर्जमाफी सिद्ध करुन दाखवा काँग्रेस निवडणूक सोडेल, असा खुले आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. ते मिरजेतील काँग्रेस सभेत बोलत होते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी काँग्रेसच्या वतीने मिरजेत वचनपूर्ती सभेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रिय काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. या प्रसंगी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी केंद्रिय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत घोषणा केली होती की में खाऊंगा नाही और किसी को खाने नही दूंगा. मग, देशाच्या सुरक्षेच्या दुर्ष्टीने आम्ही रॅफेल विमान खरेदीचा निर्णय घेतला आणि मोदी यांनी स्वस्तात रॅफेल विमान खरेदी केली. ज्यात 32 हजार कोटींचा घोटाळा का केला? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. तर राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्राती ल संरक आणि इंदू मिल ठिकाणी डॉ. बाबासाहेब यांच्या सामरिक उभारण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला सर्व परवानग्या घेतल्या यांनी फक्त उद्धाट्नाचे श्रेय घेतले. छत्रपतींच्या स्मारकाची उंची कमी करण्याचे पाप भाजप सरकारने घेतले. शिवाय, 4 वर्षे उलटली तरीही अद्याप इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाची एक वीट भाजप सरकारला रचता आली नाही, असा आरोप यावेळी चव्हाण यांनी केला.