Breaking News

गावठी कट्टा, पिस्तूलांची माहिती देणारास 25 हजारांचे बक्षीस

अहमदनगर जिल्ह्यातील गावठी कट्टा, पिस्तूलांची माहिती देणारास 25 हजारांचे बक्षीस देणार असून, तालुक्यातील अवैध सावकारी, अवैध बंदूक तलवार, अवैध व्यवसायांची माहिती देणारांनाही रोख रक्कमेचे बक्षीस पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जाहीर केले असून, नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत असून त्यासाठी 10 पथक वेगवेगळ्या दिशांनी काम करत आहेत. हल्लेखोरांवर मोक्का लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी ग्रामसभेत दिली.