2019 मध्ये प्रादेशिक पक्षांचीच सरशी : चंद्राबाबू नायडू
विजयवाडा - निवडणूक स्थानिक पक्ष एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणूक जिंकतील असा विश्वास आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.भाजपने खोटी आश्वासने दिली परंतु काहीच केले नाही, 2019 च्या निवडणुकीत भाजपला अपयश चाखायला मिळेल. राज्यात तणाव निर्माण करण्यासाठी कट रचणे सुरू असले, तरी आम्ही त्यांना असे करू देणार नाही, असे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी व भाजपवर हल्ला चढवत मोदी सरकार दिखाऊ सरकार आहे. मोदी मोठ्या गोष्टी क रतात परंतु प्रत्यक्षात काही करत नाहीत. नोटाबंदी अर्थशास्त्राला सहाय्यक ठरेल असे आपल्याला वाटले होते, परंतु केंद्रामुळे बँका दिवाळखोरीला निघत आहेत. लोकांचा बँक प्रणालीवरील विश्वास कमी होत आहे, असे नायडू यांनी सांगितले. दरम्यान अमरावती येथील नायडूंच्या निवसस्थानाहून बाईक रॅली काढण्यात आली. महानाडू कार्यक्रमाच्या नि मित्ताने नायडू यांनी एन. टी. रामाराव यांना श्रद्धांजली अर्पण केली.