Breaking News

पेट्रोल-डिझेलचा भडका कायम ; सलग 14 व्या दिवशीही दरवाढ सुरूच


नवी दिल्ली/प्रतिनिधी : पेट्रोल-डिझेलच्या दररोज गगनाला भिडणार्‍या दरांनी सर्व सामान्य जनतेला दैनंदिन कामासाठी देखील गाडीवरचा प्रवास करणे खिशाला मोठे भगदाड पाडण्याचा प्रकार होऊन बसला आहे. आज सलग 14 व्या दिवशीही इंधनाचा भडका उडणे सुरूच आहे. महानगरीय शहरांमध्ये पेट्रोलचे आजचे सुधारित दर दिल्लीत 78.12 रुपये, मुंबईत 85.93 रुपये, कोलकाता 80.76 रुपये आणि चेन्नई 81.11 रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान, डिझेलच्या दरात वाढ होऊन हा दर दिल्लीत 69.06 रुपये, कोलकाता 71.61 रुपये, मुंबईत 73.53 रुपये आणि चेन्नईमध्ये 72.91 रुपये प्रतिलिटर एवढा आहे. इंधनाच्या किमतीत होणार्‍या या वाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठल्याने मोदी सरकारवर चौफेर टीक ा होत आहे. त्यामुळे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकार लवकरच यावर उत्तर काढेल असे वेळकाढू उत्तर दिले आहे. मात्र इंधनाच्या किमतीत कोणतीही कमी होत नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य लोकांच्या खिशाला बसत आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नियोजनच कोलमडत आहे. यावेळी बोलताना प्रधान यांनी इंधनाच्या उत्पादनात घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत दरवाढ हे घटक पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर परिणाम करत असल्याचे सांगितले.