Breaking News

अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्या भुमिकेची चौकशी कार्यकारी अभियंत्यांच्या अधिकारावर गदा आणून मर्जीतील कंत्राटदाराला कामाचे वाटप

औरंगाबाद/ विशेष प्रतिनिधी - अधिक्षक अभियंता तथा प्रभारी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सिमिलर टाईप आफ वर्क डन या नियमाला हरताळ फासून मर्जीतील कंञाटदाराला तब्बल पासष्ट लाखाचे कं त्राट देण्याचा प्रयत्न फसला आहे. दरम्यान हे प्रकरण प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांच्या दरबारात दाखल झाल्याने औरंगाबाद अधिक्षक अभियंत्यांचा शहाजोगपणा अडचणीत येण्याचे संकेत आहेत.

औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांची सार्वजनिक बांधकाम विभागातील कारकिर्द नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. यापुर्वी पुणे साबां, मुंबई साबां आणि आता औरंगाबाद साबांतही भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांशी अतुल चव्हाण यांचे नाव जोडले जात आहे. अलिकडेच चर्चेत आलेले 65 कोटीचे प्रकरण नवा वाद निर्माण करीत आहे.
साबांचे कंत्राट देतांना काही मुलभूत अटी शर्ती प्रमाणीत करणे आवश्यक आहे. कार्यकारी अभियंत्यांच्या अखत्यारीत या अटी शर्ती प्रमाणीत कराव्यात असा शासनाचा दंडक आहे. या विशिष्ट प्रकरणात अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी कार्यकारी अभियंत्यांना बायपास करून अधिकार वापरण्याचा शहाजोगपणा दाखविला. आपल्या मर्जीतील कं त्राटदाराला काम देण्यासाठी अतूल चव्हाण यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या अधिकारावर गदा आणल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रधान स चिवांनी दिल्याचे वृत्त आहे. (क्रमशः)