नागरी वस्तीमध्ये 10 कोटी 83 लाख रूपयांच्या 54 विकास कामांना मंजुरी
सोलापूर, दि. 11, मे - जिल्ह्यातील 13 नगरपालिकांमध्ये अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या कामांसाठी 21 कोटी 78 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 11 नगरपालिकांमध्ये नागरी वस्तीमध्ये 10 कोटी 83 लाख रूपयांच्या 54 विकास कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. जे प्रस्ताव अपूर्ण आहेत, ते पुन्हा नव्याने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मंजूर निधीतून या निधीतून रस्ते, गटार, रस्ते क्राँकिटीकरण, सभागृहाचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहे. नागरी वस्ती सुधारणेसाठी ज्या नगरपालिकांकडून प्रस्ताव प्राप्त आहेत, त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने एकूण 21 कोटी 78 लाख रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यापैकी एका नगरपालिकेकडून 4 ते 6 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. दुधनी व मैंदर्गी नगरपालिकेकडून एकही प्रस्ताव प्राप्त नाही तर महापालिका आयुक्त नसल्याने महापालिकेच्या प्रस्तावावर चर्चा के ली नसल्याचे प्रशासन अधिकारी यांनी सांगितले.