केदारनाथला दर्शनासाठी भाविकांची गर्दी
देहरादून : सहा महिन्यानंतर उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला असून पहिल्याच दिवशी हजारो भक्तांनी केदारनाथाचे दर्शन घेतले आहे. तसेच, केदारनाथ यात्रेनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वाराला सजवण्यात आलं आहे.आज पहाटे 6 वाजून 10 मिनिटांनी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर राज्यपाल केके पॉल आणि विधानसभा अध्यक्ष प्रेम चंद अग्रवाल यांनी सर्वात प्रथम दर्शन घेतलं. यानंतर सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर अवघ्या एका दिवसात पाच हजारापेक्षा जास्त भक्तांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. तर जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी ऑनलाईन र जिस्ट्रेशन केलं असल्याची माहिती बदरीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. सिंह यांनी दिली.