छत्तीसगडमधील कारवाईत दोन नक्षलवादी ठार
छत्तीसगड - विजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांची छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा रक्षकांसमवेत चक मक उडाली. या चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवादी ठार झाल्याचे एका ज्येष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले. या चकमकीत अन्य अनेक नक्षलवादी जखमी झाले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.सुकमा जिल्ह्यातील बुरकापल परिसरात असलेल्या मेटागुदाम गावाजवळच्या जंगलात ही चकमक झडली, असे पोलीस उपमहानिरीक्षक (दक्षिण बस्तर परिमंडळ) सुंदरराज पी. यांनी सांगितले.
दुसर्या एका कारवाईत कोंडागाव जिल्ह्यात एका महिलेसह तीन नक्षलवाद्यांनी शनिवारी शरणागती पत्करली. नक्षलवादी विचारसरणीने आल्याने त्यांनी शरणागती पत्करली, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर नाग यांनी सांगितले.