Breaking News

कोेपरगांव येथे महिलांना कडकनाथ कोंबडी पिल्लांचे वाटप


येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगाराची निर्मीती व्हावी यासाठी त्यांना कडकनाथ कोंबडी पिल्लांचे प्रत्येकी वीस प्रमाणे आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, तालुका कृषि तंत्रज्ञान अधिकारी प्रकाश आहेर यांच्यासह महिला बचतगटाच्या प्रतिनिधी उपस्थित होेते. प्रारंभी तालुका कृषि अधिकारी अशोक आढाव यांनी प्रास्तविक केले. या कडकनाथ कोंबडी पिल्लाचे अंडे हदयविकाराच्या रूग्णांसाठी अत्यंत गुणकारी असते ते रक्त शुध्द करण्यास मदत करते. महिला घरसंसार प्रपंचाचा गाडा हाकण्यांसाठी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारखे अनेक छोटे-छोटे व्यवसाय राबवित असतात. या कडकनाथ कोंबडी पिल्लांच्या संवर्धनातून त्यांना शाश्‍वत रोजगार उपलब्ध होणार आहे. आरोग्यवर्धक अंड्यांच्या विक्रीतुन महिलांना शाश्‍वत रोजगाराची वृध्दी व्हावी, यासाठी कडकनाथ कोंबडी पिल्लांचे वाटप करण्यात आल्याचे आमदार कोल्हे म्हणाल्या.