Breaking News

हरिसन ब्रँच लाभधारक शेतकर्‍यांचे पाटपाण्यांचे भरणे तातडीने पुर्ण करा


गोदावरी उजव्या कालव्याचे लाभधारक क्षेत्र मोठे आहे. यावर्षी धरणांत पुरेसे पाटपाणी असूनही त्याचे पाटबंधारे खात्याकडून व्यवस्थीत नियोजन होत नसल्याने हरिसन ब्रँच चारी लाभधारक शेतकरी प्रत्येक आवर्तनांत दुर्लक्षित राहतात. तेंव्हा त्यांचे पाटपाण्यांचे भरणे तातडींने पुर्ण करून देण्याचे आदेश आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिले.
गोदावरी उजव्या कालव्यावरील लाभधारक शेतकर्‍यांची पाटपाण्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यांसाठी हरिसन ब्रँच चारी जेऊरकुंभारी येथे आ. कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्या बोलत होत्या. प्रारंभी गोदावरी उजवा तटकालव्याचे उपअभियंता कासम गोतुमवार यांनी पाटपाण्यांच्या भरण्यांबाबत तपशिल सांगितला. याप्रसंगी संजीवनीचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते, मधुकर वक्ते, राजेंद्र गुरसळ, जालींदर चव्हाण, सुभाष सांबारे, विजय शिंदे, धर्मा होन यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.आमदार स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, शेतकरी पाण्यासाठी मेटाकुटीला आला आहे. त्याच्या सहनशिलतेचा पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी अंत पाहू नये. उपअभियंता कासम गोतुमवार यांनी तक्रारी ऐकून घेत प्रत्येकाचे समाधान केले. पाणी तातडींने देण्यांबाबत कार्यवाही राबविली जाईल असे सांगितले. शेवटी मधुकर वक्ते यांनी आभार मानले.