Breaking News

बारडगाव सुद्रीक येथे एलपीजी गॅसचे वाटप


तालुक्यातील बारडगाव सुद्रीक येथे एलपीजी गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. शीतल गावडे या होत्या. डॉ. शाम प्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेंतर्गत रेहेकुरी माळढोक अभयारण्याच्या वतीने 85 लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले, तर उज्ज्वला योजनेअंतर्गत 5 लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच गावडे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना 100 रुपयांत गॅस उपलब्ध करून दिल्यामुळे स्वयंपाकाच्या धुरामुळे होणार्‍या डोळ्याच्या आजारांपासून मुक्ती मिळणार असल्याचे सांगून गावातील वृक्ष तोड न करण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. यावेळी उपसरपंच संजय सुद्रीक, अश्‍विनी पारखे, मा. उपसभापती डॉ. सुनील गावडे, रेहेकुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी बापूसाहेब येळे, वनरक्षक दादा धांडे, आर. आर. कोळी, साई गॅस एजन्सीचे संचालक बिभीषण खोसे, सारंग भोगे, संतोष गंगावणे, जमीर शेख आदी उपस्थित होते.