Breaking News

डाँ. आंबेडकर मोलाचे दिपस्तंभ : अँड. पोळ


कोपरगाव: डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य जनतेच्या उध्दाराकरीता आयुष्यभर कष्ट घेतले. न्यायवंचिताच्या लढ्यासाठी आंबेडकरांचे जीवन प्रेरणादायी आहे. डाँ. आंबेडकर हे न्यायवंचितांच्या लढ्यातील मोलाचे दिपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी केले.

डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोकस्वराज्य आंदोलनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या अभिवादन सभेत अँड. पोळ बोलत होते. प्रारंभी सुजल चंदनशिव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास रविंद्र पाठक, सोमनाथ म्हस्के, भारत रोकडे, विक्रम चंदनशिव, विनोद वाकळे,बाबुराव पवार प्रकाश कोपरे आदी उपस्थित होते. विनोद वाकळे यांनी आभार मानले.