शेतकरी संपाला हिंसक वळण, एसटीची तोडफोड
उस्मानाबाद, दि. 06 - शेतकर्यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिसंक वळण लागले. शेतकर्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील 5 एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या. सातार्यात दगडफेकही करण्यात आली. यात कळंब तालुक्यात मोहा आणि मस्सा येथे 3 तर लोहर्यामध्ये 2 बसेसची तोडफोड करण्यात आली. उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी परीसरातील संतप्त शेतकर्यांनी समुद्रवाणी तांडा रस्त्यावर जाळपोळ करून आणि अर्धनग्न आंदोलन करत रस्ता रोको केला. त्यामुळे उस्मानाबाद-औसा रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. तालुका पातळीवरील शहरांपेक्षा ग्रामीण भागात आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे.
तर नागपूरात शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आंदोलन दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर फेकले. जय जवान-जय किसान संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या दिघोरी चौकात हे आंदोलन करण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुकमधील शेतकरी कर्जमाफीसाठी गावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढलेत आणि शोले स्टाइल आंदोलन केले. सर्व पक्षीय आंदोलकांनी सांगलीतील जी दुकाने सुरू होती ती बंद केली. सांगली शहरात मोटारसायकल रॅली काढून दुकाने बंद केली. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, परवानगी नाकारल्या नंतर ही, आंदोलकांनी रॅली काढली.