तिळवणीला डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
कोपरगाव: तालुक्यातील तिळवणी येथील सद्गगुरू गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन सामुहिक अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष विष्णू वाघ, विठ्ठल पगारे, ग्रंथपाल एन. व्ही. वाघ, अनिल शेळके आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.