संविधानाचे अधिकार कमी करण्याचे कारस्थान : विखे
लोणी प्रतिनिधी - प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले आधिकार कमी करण्याचे कारस्थान सध्या सुरु आहेत. नाव संविधानाचे घ्यायचे आणि आचरण मात्र मनुस्मृतीप्रमाणे करायचे, असा ढोंगीपणा सध्या सुरु आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे अधिकार कमी करण्याचे कारस्थान देश खपवून घेणार नाही, असा इशारा विरोधी पपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून लोणी येथील फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, काशिनाथ विखे, किसनराव विखे, संपतराव विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, माजी उपसभापती सुभाषराव विखे, कारखान्याचे संचालक प्रतापराव तांबे, ग्रामपंचायत सदस्य गणेश विखे, राहुल धावणे, भाऊसाहेब विखे, नवनित साबळे, शंकर विखे, सचिन विखे, सुधाकर विखे आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. शरद साबळे यांनी प्रास्ताविक केले..