Breaking News

दिल्लीमध्ये पुन्हा सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली, दि. 29 -  देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहराच्या पूर्व भागामधील एका खासगी शाळेच्या आवारामध्ये एका 17 वर्षीय तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे वृत्त बुधवारी सूत्रांनी दिले. ही तरुणी घरगुती कामे करणारी असून तिला शाळेमध्ये नोकरी लावण्याचे आश्‍वासन देऊन फसविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींपैकी एकास ती गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून ओळखत असून त्यानेच तिला फसविल्याचे आढळून आले आहे.