Breaking News

‘प्रितीसुधाजी’चे विद्यार्थी घेताहेत आगळे वेगळे शिक्षण!


राज्यात ‘डांगे पॅटर्न’ म्हणून नावाजलेल्या प्रितीसुधाजी इंग्लिश मिडीअम स्कुलमधील विद्यार्थी आधुनिक ज्ञानाबरोबरच अध्यात्मिक धार्मिक पध्दतीने प्राणी, पक्षी यांच्या सानिध्यात निसर्गमय वातावरणात आगळे वेगळे शिक्षण घेत आहेत. 

गेल्या ४० वर्षांपासून ‘डांगे पॅटर्न’च्या माध्यमातून राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक आगळी वेगळी शैक्षणिक संस्था म्हणून राहत्यातील प्रितीसुधाजी इंग्लिश मिडीअम स्कूल ही नावारुपास आलेली संस्था आहे. या स्कुलमध्ये ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना निसर्गमय वातावरणाचा आनंद दिला जात आहे. प्राणी व पक्षी यांच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना आगळे वेगळे शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना नाविण्यपूर्ण शिक्षण दिले जाते. त्यांच्याकडून ‘डांगे पॅटर्न’अंतर्गत संपूर्ण एका विषयाचा अभ्यास पूर्ण करुन घेऊन त्या विषयाची विद्यार्थ्यांकडून आकलन जाणून घेतले जाते. त्या विषयांवर त्यांच्याकडून वाचन व लिखान करुन घेऊन चाचणी परिक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांकडून तो विषय परिपक्व करुन घेतला जातो. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षण सुधारणे, नोटबुक व्यवस्थापन, अॅटक्लास वाचन व डेमो व डाल्टन सिस्टिम आदी प्रकारच्या पध्दती वापरुन विद्यार्थ्यांकडून अभ्यास करुन घेतला जातो. याच पध्दतीला ‘डांगे पॅटर्न’ म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जाते. 

‘डांगे पॅटर्न’चे अनुकरण राज्यातील विद्यालयांनी केले आहे. प्रीतिसुधाजी स्कुलमध्ये सी. बी. एस. सी, स्टेट बोर्ड मुलामुलींसाठी स्वतंत्र होस्टेल अशी व्यवस्था आहे. राज्यातील व परराज्यातील हजारो विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षणाचे धडे घेत आहेत. ही शाळा २१ एकर जागेमध्ये वसविण्यात आली आहे. येथे ५० प्रकारची झाडे असून यात चिकु, पेरु, संत्रा, मोसंबी, नारळ, सिताफळ विविध प्रकारच्या फळझाडांच्या बागा आहेत. स्कुलचे संस्थापक इंद्रभान डांगे यांनी अत्यंत दुष्काळी परिस्थिती असतांनाही टँकरने पाणी घालुन ही फुलझाडे व फळबागा चांगल्या पध्दतीने जोपासल्या आहेत. निसर्गाबरोबरच शाळेमध्ये घोडा, गाय, बैल, कुत्रे, बदक, इमु असे अनेक प्रकारचे पक्षी व प्राणी या कॅम्पसमध्ये राहतात. तसेच या ठिकाणच्या झाडांवर अनेक मधमाश्यांचे मोहळ डांगे यांनी जोपासली आहेत. झाडे, फळे, फुले, पक्षी, प्राणी यांच्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चांगल्या प्रकारची उर्जा मिळते. शिक्षणाबरोबरच या विद्यालयात धार्मिक अध्यात्मिक व सांस्कृतिक मुल्यांची शिकवण येथील विद्यार्थ्यांना दिली जाते. श्रीराम गाथा सप्ताह, किर्तन महोत्सव पसायदान, हनुमान चालिसा अशा धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम या विद्यालयातील विद्यार्थी दररोज पहाटे टाळ मृदूंगाच्या गजरात माऊलीच्या पाऊलीवर ठेका धरीत भक्तीरसाने मग्न होतात. येथील विद्यार्थ्यांकडून संगितातील गायन व वादन, परिक्षापूर्ण अभ्यासअंती या स्कुलमध्ये घेतले जातात. गणपती उत्सव नवरात्र बैलपोळा, दसरा दिवाळी असे विविध प्रकारचे धार्मिक सण होस्टेलच्या विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरे करुन त्या धार्मिक सणाविषयीची माहिती दिली जाते. येथील विद्यार्थी स्केटींगमध्ये अव्वल आहेत. शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी स्केटींगमध्ये सहभाग घेऊन राहता ते शिर्डी पायी दिंडी सहभाग नोंदविला याचे कौतूक संपूर्ण परिसराने केले. 

व्हॉलिबॉल, फूटबॉल, किक बॉक्सींग, शिकाई मार्शल, मार्शल आर्टस, अॅथेलिटीक्स, घोडसवारी, तलवारबाजी, रायफल शुटींग, धनूर्विद्या खो-खो, कबड्डी असे विविध प्रकारच्या खेळांमध्ये समृध्द असणारे या विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.विद्यार्थ्यांचा ‘बर्थ डे’ ज्या प्रकारे स्कुलमध्ये साजरा केला जातो, त्याचप्रकारे विविध प्रकारच्या फळांचा फ्रुटडेही या ठिकाणी साजरा होतो. होस्टेलमधील ५०० विद्यार्थी या ठिकाणी राहतात. हे विद्यार्थी ३५ जिल्ह्यातील व १० राज्यातील आहेत. येथील विद्यार्थ्यांना आपण घरी असल्यासारखे वाटावे, म्हणून संस्थापक इंद्रभान डांगे व त्यांच्या पत्नी स्नेहलता डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, पुनम डांगे यांनी होस्टेललाच आपले घर बनविले आहे. बाराही महिने या मुलांबरोबर राहून संपूर्ण आयुष्य डांगे कुटूंबियांनी हे विद्यार्थ्यांसाठी अर्पण केले आहे. इंद्रभान डांगे यांनी कॅन्सरसारख्या दिर्घ शत्रूलाही त्यांनी पराजित केले. ज्ञानाबरोबरच सांस्कृतिक, अध्यात्मिक निसर्गमय प्राणी पक्षी यांच्या वातावरणात असलेले डांगे पॅटर्न म्हणून या स्कुलची ओळख संपुर्ण राज्याला आहे. स्कुलचे प्राचार्य ज्ञानेश डांगे व पूनम डांगे यांनीही आता या शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी मेहनत घेत आहेत.