पैठणमध्ये तापमानाने गाठली चाळीशी
शहरातील बहुतांश चौकात तसेच मुख्य बाजार पेठेत अत्यल्प वर्दळ, रहदारी पहायला मिळाली. नेहमी गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातही शुकशुकाट होता. दुकाने उघडी होती. मात्र ग्राहक दिसत नव्हते. उन्हापासून बचाव करण्यासाठी येथील नागरिक छत्री, टोप्या, गॉगल या वस्तू वापरत उपाययोजना करू लागले आहेत.