आश्वी बुद्रुक येथे विद्यार्थ्याना सायकल वाटप
आश्वी : प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील आश्वी इंग्लिश स्कूलच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात या विद्यालयाच्या ५ वी ते १० वी इयत्तेत शिकणाऱ्या २० गरीब विद्यार्थ्यांना जि. प. च्या समाजकल्याण विभागातर्फे सायकलींचे वाटप करण्यात आले.
जिल्हापरिषद व संगमनेर पंचायत समिती अंतर्गत समाजकल्याण विभागाकडून आश्वी बुद्रुक येथील आश्वी इंग्लिश स्कूलच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी सायकली मजूंर करण्यात आल्या होत्या. या मंजूर सायकलींचे आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीच्यावतीने वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कोळपकर यांनी उपस्थितांना या योजनेसंबधी सविस्तर माहिती दिली.
यावेळी नामदेव मदने, शाळिग्राम चंद, दिलीप गांधी, सुशिल भंडारी, सिताराम चांडे, बाळासाहेब जऱ्हाड, भाऊसाहेब डोईफोडे, अण्णासाहेब जऱ्हाड, हारुण शेख, अण्णा जाधव, दत्ता आचपळे, भाऊसाहेब पिलगर, बाळासाहेब केदारी, विद्यालयाचे शिक्षक व लाभधारक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्राचार्य गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन शिक्षक घोलप यांनी केले आहे.