Breaking News

रमजाननिमित्त दोन ठिकाणी विशेष नमाजाचे होणार पठण


सोलापूर, दि. 30, एप्रिल - इस्लामी पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही हजरत इमाम हुसेन एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी व बारा ईमाम चौक युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्र दर्शनापासून दररोज रात्री साडेआठ ते साडेदहा वाजेपर्यंत दोन ठिकाणी सामुदायिक नमाज व पूर्ण कुराण पठणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मकबूल मोहोळक र यांनी दिली. 

हजर इमाम हुसेन पटांगण इक्बाल मैदान येथे चंद्र दर्शनापासून दहा दिवस तरावीह सामुदायिक नमाज व एक पूर्ण कुराण पठण कारी हाफीज मौलान गुलाम वारीस इलाहाबादवाले क रणार आहेत. तर, गौसिया मस्जीद मुस्लिम कब्रस्तान जडेसाब बंगला येथे चंद्रदर्शनापासून 20 दिवस तरावीह सामुदायिक नमाज व दोन पूर्ण कुराण पठण हाफीज मौलान रफिकुर्रहिमान करणार आहेत. ट्रस्टतर्फे दोन ठिकाणी संपूर्ण व्यवस्थेसह पत्राशेड, वजूखाना, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील मुस्लिम बांधवांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मोहोळकर यांनी केले.