Breaking News

अकोल्यात तापमानाने गाठली पंचेचाळीशी


अकोला, दि. 30, एप्रिल - एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात अकोल्यात तापमानात मोठी वाढ झाली असून, आता पारा 45 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलाय. या वर्षातील हे सर्वाधिक तापमान आहे. रात्रीचे तापमानही वीस अंशांच्या पुढे गेल्याने रात्रीही असहाय उकाडा जाणवत आहे. शनिवारी संपलेल्या चोवीस तासांत अकोल्यामध्ये सरासरी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 26.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

आज ही अकोल्याचे तापमान 44.7 नोंदविण्यात आले. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असल्याने येणारा मे महिना अकोलेकरांसाठी त्रासदायक राहील यात शंका नाही. त्यामुळे अकोलेकरांना दिवसा 12 ते 5 या वेळेत प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे अवघड झाले असून, सावलीतही उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत. दुपारी शहरातील रस्ते ओस पडले असून, दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे