गतवर्षी अमली पदार्थप्रकरणी ३९७ विदेशी नागरिकांना अटक.
नवी दिल्ली : देशातील अमली पदार्थांच्या गुन्ह्यांप्रकरणी गत वर्षी एकूण ३९७ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. या विदेशी नागरिकांमध्ये ४० टक्के नायजेरियाच्या लोकांचा समावेश असल्याची बाब नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोच्या नवीन अहवालातून समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांमध्ये नायजेरियातील १५७ जण, नेपाळमधील ९५ जण, म्यानमारमधील ४६ जण आणि दक्षिण आफ्रिकेतील १३ जणांचा समावेश आहे..