Breaking News

कठुआच्या सीबीआय चौकशीसाठी रॅली .


देशाला हादरावून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार आणि हत्येची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपाचे नेते लाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी काश्मीर खोऱ्यात रॅली काढण्यात आली. हे प्रकरण हातळण्यात निष्फळ ठरलेल्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केले आहे. भाजपाचे लाल सिंग आणि चंदर प्रकाश गंगा हे महबुबा सरकारमध्ये मंत्री होते. कठुआ प्रकारणातील आरोपींच्या समर्थनात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये त्यांनी समावेश घेतल्यावरून बराच वादंग झाला होता. यानंतर १३ एप्रिल रोजी दोन्ही नेत्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. .