खर्चिक आरोग्य सुविधांना मोफत आरोग्य शिबीरे सर्वसामान्यांसाठी पर्याय -डॉ.महेश वीर
खर्चिक आरोग्य सुविधांना मोफत आरोग्य शिबीरे सर्वसामान्यांसाठी पर्याय ठरत आहे. अशा शिबीरांची उपनगर भागात गरज आहे. आजार होवू नये यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी महत्त्वाची असल्याची भावना डॉ.महेश वीर यांनी व्यक्त केली.
जिल्हा क्रीडा कार्यालय व उत्कर्ष बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवा निमित्त नगर-सोलापूर महामार्गावरील कोंबडीवाला मळा येथे मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ.वीर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.भास्कर रणनवरे, डॉ.अमिल कुलांगे, छाया निमसे, अॅड.भानुदास होले, अॅड.सुनिल तोडकर, अॅड.महेश शिंदे, अॅड.छाया निमसे, रावसाहेब काळे आदि उपस्थित होते.
डॉ.वीर पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांनी सर्वसामान्यांना शिकण्यासाठी प्रेरणा दिली. कमवलेल्या दोन रुपयातून त्यांनी एक रुपयांची पुस्तके घेण्याचे सांगितले. वाचनाने ज्ञानाची ज्योत पेटून अंधारलेले जीवन प्रकाशमान होणार आहे. महात्मा फुलेंनी सर्व समाजाच्या उध्दारासाठी महिलांना शिक्षणाचे दारे उघडी करुन दिली. या महापुरुषांचे वीचार आजही दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा नयना बनकर म्हणाल्या की, सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक आरोग्याबाबत जागृक नसतात. आरोग्य सुविधा खर्चिक असल्याने, एखादा मोठा आजार झाल्यास ते हॉस्पिटलमध्ये जातात. सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी दरवर्षी या शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.पाहुण्यांचे स्वागत सिमोन बनकर यांनी केले.
या शिबीराला परिसरातील नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करुन, सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी जयश्री शिंदे, योगिता देवळालीकर, माया जाधव, रजनी ताठे, पोपट बनकर, रोहिदास गाढवे, सुनिल गायकवाड, जयेश शिंदे, दर्शन बनकर, दिनेश शिंदे, उज्वला कांबळे, सुनिता जाधव, शारदा मिरपगार, प्रिया पवार, स्वाती बनकर आदि विविध स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड.महेश शिंदे यांनी केले. आभार सोनाली दळवी यांनी मानले. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी व क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांचे मार्गदर्शन लाभले.