Breaking News

दहशतवाद्यांबरोबर चकमकीत जवान शहीद ; एका नागरिकाचाही मृत्यू


श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू आहे. यात एक जवान शहीद झाला आहे, तर एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील वनी मोहल्ला येथे लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षादलाच्या जवानांवर गोळीबार केला. यात दोन सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळच विरोध सुरू झाला. यात शारजील शेख (28) हा गोळी लागून जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. येथील एका घरात अद्यापही लश्कर-ए-तोयबाचे दोन ते तीन दहशतनादी लपून बसलेले आहेत. प्रशासनाने कुलगाम येथील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारीही दक्षिण काश्मीरच्या पुलगाममधील क ांगन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.